आकड्यांचा पेच… धनुष्यबाण अन् कमळात रस्सीखेच तर रामदास कदमांच्या टीकेनंतर फडणवीसांचं सडेतोड उत्तर
भाजप इतर पक्षांना नेस्तनाभूत करणार का? अशी शंका त्यांच्याच सहकारी पक्षातील नेते व्यक्त करताय. तर हा वाद आहे संभाव्य कमी जागा देण्याचा....यावरून शिवेसनेचे रामदास कदम यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरच घणाघाती टीका केली.
मुंबई, ८ मार्च २०२४ : जागावाटपात कुणाचा किती वाटा असेल यांच्या संभाव्य फॉर्म्युल्यावरून शिवसेनेचे नेते रामदास कदम यांनी भाजपवर आगपाखड केली. सगळ भाजपलाच हवंय काय? असं म्हणज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीवरही निशाणा साधला. भाजप इतर पक्षांना नेस्तनाभूत करणार का? अशी शंका त्यांच्याच सहकारी पक्षातील नेते व्यक्त करताय. तर हा वाद आहे संभाव्य कमी जागा देण्याचा….यावरून शिवेसनेचे रामदास कदम यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवरच घणाघाती टीका केली. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण ४८ जागा आहेत. तर महायुतीत जागा वाटपाचे तीन फॉर्म्युले चर्चेत आहे. पहिला फॉर्म्युला आहे, ३७ जागा भाजप, ०८ जागा शिंदे यांची शिवसेना आणि ०३ जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला…दुसरा फॉर्म्युला आहे, ३५ जागा भाजप, १० जागा शिंदे यांची शिवसेना आणि ०३ जागा तर तिसरा फॉर्म्युला आहे, ३३ जागा भाजप, ११ जागा शिंदे यांची शिवसेना आणि ०४ जागा अजित पवार यांच्या राष्ट्रवादीला मिळणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदेंचे नेते किमान १५ जागांचा आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते किमान ११ जागांचा आग्रह धरताय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट