राज ठाकरेंच्या 'त्या' टीकेवर फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर, 'शिंदेंवर जनतेचा विश्वास अन् त्यांच्या नेतृत्वात...'

राज ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेवर फडणवीसांचं जोरदार प्रत्युत्तर, ‘शिंदेंवर जनतेचा विश्वास अन् त्यांच्या नेतृत्वात…’

| Updated on: Nov 05, 2024 | 1:43 PM

'गद्दारी केलेले लोक मी याआधी कधी पाहिले नाहीत. त्यावेळी लोकांसमोर कसं जायचं हा विचार करून मान खाली घालून जायचे. पण आता पक्ष, निशाणी आणि नाव ताब्यात घेतलं आहे. मात्र धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांची मालमत्ता नाही.', असं म्हणत राज ठाकरेंनी शिंदेंवर निशाणा साधला होता. त्यावर फडणवीसांनी प्रत्युत्तर दिलंय.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचा श्रीगणेशा केला. राज ठाकरे यांनी मनसे आमदार राजू पाटील यांच्या मतदारसंघापासून विधानसभेच्या प्रचाराला सुरुवात केली. यावेळी त्यांनी महायुतीतील एकनाथ शिंदे यांच्या पक्षावर जोरदार निशाणा साधला. राज ठाकरे म्हणाले, एकनाथ शिंदे 40 आमदार घेऊन गेले. तेव्हा ते म्हणाले होते, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांबरोबर बसणं, काम करणं आणि अजित पवारांबरोबर मांडीला मांडी लावून बसणं म्हणजे मला श्वास घेता येईना. त्यानंतर एकनाथ शिंदे भाजपाबरोबर जाऊन बसले आणि मुख्यमंत्री झाले. तर पक्ष, निशाणी आणि नाव ताब्यात घेतलं आहे. मात्र धनुष्यबाण आणि शिवसेना हे नाव उद्धव ठाकरे व एकनाथ शिंदे यांची मालमत्ता नाही. ती फक्त बाळासाहेब ठाकरेंची मालमत्ता आहे, असं राज ठाकरे म्हणाले होते. या टीकेवर देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार पलटवार केलाय. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात महाराष्ट्राची प्रगती होतेय आणि ते महाराष्ट्र पाहतोय. जनतेचा विश्वास एकनाथ शिंदे यांच्यावर आहे. एकनाथ शिंदेच्या नेतृत्वात महायुती ही विधानसभा निवडणूक जिंकणार असल्याचे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी विजयाचा विश्वास व्यक्त करत राज ठाकरेंनी केल्याला टीकेला जोरदार प्रत्युत्तर दिलंय. ते नागपुरात भाजपच्या प्रचार रॅलीदरम्यान बोलत होते.

Published on: Nov 05, 2024 01:43 PM