राम मंदिरावरून ठाकरे-फडणवीस यांच्यात ‘सामना’, उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ टीकेला फडणवीसांचं काय प्रत्युत्तर?
उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आणि बाबरीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र डागलं होतं. दरम्यान, यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर प्रत्युत्तर दिलंय. एकीकडे देशात राम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू असताना राम मंदिरावरून ठाकरे-फडणवीस यांच्यात 'सामना'
मुंबई, १५ जानेवारी २०२४ : राम मंदिराच्या मु्द्द्यावरून राज्यात चांगलंच राजकारण रंगलंय. शनिवारी उद्धव ठाकरे यांनी राम मंदिर आणि बाबरीवरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर टिकास्त्र डागलं होतं. दरम्यान, यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्यावर प्रत्युत्तर दिलंय. एकीकडे देशात राम मंदिराच्या लोकार्पणाच्या पार्श्वभूमीवर जोरदार तयारी सुरू आहे. मात्र दुसरीकडे याच मुद्द्यावरून राजकारण रंगताना दिसतंय. तर बाबरीच काय तर हिमालयाला हलवण्याची ताकद आमच्यात आहे, असे म्हणत देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंवर पटलवार केलाय. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला. राम काय खात होते ते बाजूला ठेवा तुम्ही शेण खाताय, असं म्हणत फडणवीस यांनी आव्हाडांवर हल्लाबोल केलाय. बघा जितेंद्र आव्हाड यांच्या प्रभू श्रीरामाच्या वक्तव्यावर काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?