‘ज्या पक्षाचा बँडबाजा…’, नितीन गडकरींना दिलेल्या ‘त्या’ ऑफरवरून फडणवीसांचा ठाकरेंवर थेट पलटवार
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीकडून आम्ही त्यांना निवडून आणू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.
मुंबई, ८ मार्च २०२४ : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना उद्धव ठाकरे यांनी ऑफर दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी ठाकरेंवर जोरदार पलटवार केला आहे. ज्या पक्षाच्या बँडबाजा वाजलाय त्यांनी नितीन गडकरी यांना ऑफर दिली आहे, अशा शब्दात देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. तर महाराष्ट्रातील यादी आल्यावर नितीन गडकरी यांचं नाव पहिलं असेल असंही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी म्हटलं आहे. नितीन गडकरी यांनी राजीनामा द्यावा, महाविकास आघाडीकडून आम्ही त्यांना निवडून आणू, असे उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते. तर असे वक्तव्य करून नितीन गडकरी यांना महाविकास आघाडीमध्ये येण्याची ऑफर उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरी यांना दिली होती. उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या याच ऑफरवरून देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांना घेरत त्यांच्यावरच पलटवार केल्याचे पाहायला मिळत आहे.