Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वर्षभरात 75 हजार तरुणांना नोकऱ्या, फडणवीस म्हणाले, कृपया ‘ही’ गोष्ट करू नका!

महाराष्ट्र सरकारतर्फे आज दोन हजार तरुणांना नियुक्तीपत्र वाटप करण्यात आले.

वर्षभरात 75 हजार तरुणांना नोकऱ्या, फडणवीस म्हणाले, कृपया 'ही' गोष्ट करू नका!
Follow us
| Updated on: Nov 03, 2022 | 1:40 PM

मुंबईः राज्य सरकारतर्फे लवकरच 75 हजार तरुणांना (Government Jobs)रोजगार दिला जाणार आहे. याची सुरुवात आज झाली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra FAdanvis) यांच्या उपस्थितीत आज पहिला कार्यक्रम झाला. आज दोन हजार तरुणांना नोकऱ्यांची घोषणा करण्यात आली. यावेली देवेंद्र फडणवीस यांनी तरुणांना विनंती केली.

ते म्हणाले, ही प्रक्रिया अत्यंत पारदर्शी करण्याचा आमचा प्रयत्न सुरु आहे. मात्र अनेक आरक्षणं असल्यामुळे ही प्रक्रिया किचकट असते. कृपया तरुणांनी कोर्टात केस करून भरती प्रक्रिया रद्द करू नका. आम्हीदेखील चुका करणे टाळण्याचा प्रयत्न करू…’

मुंबईत आयोजित कार्यक्रमात देवेंद्र फडणीवस बोलत होते. ते म्हणाले, ‘ ‘ नोकरी भरतीची ही प्रक्रिया पारदर्शी पद्धतीने झाली पाहिजे, असे प्रयत्न आहेत. त्यामुळे अनेक पदं एमपीएससीला दिलेत. विभागातर्फे ही पदं भरताना एक अमूलाग्र बदल केलाय. मागील सरकारमध्ये जे घोटाळे, यात पहायला मिळाले, तरुणांच्या मनात शंका निर्माण झाली.

‘टीसीएससारखी उत्तम एजन्सी आणि बँकांची परीक्षा घेणारी केंद्र सरकारची एजन्सी आहे. त्यांच्यामार्फत नॉमिनेशन पद्धतीने नेमणूक करण्यात आली आहे. लवकरच या परीक्षा सुरु करत आहोत.

वर्षभरात 75 हजार परीक्षा आटोपून ही नियुक्ती करायची आहे. 14 ते 19 च्या काळात ही भरती करायची होती. पण अनेक अडथळे आले. कोर्टकचेरी झाली. अनेकदा शासनाच्या नोकऱ्यांमध्ये विविध आरक्षण असतात. याचा आधी योग्य प्रकारे विचार झाली नाही तर कोर्ट केस होतात. मुलांना अनेक वर्ष ताटकळत बसावं लागतं.

त्यामुळे विद्यार्थी आणि तरुणाईला सांगू इच्छितो की, जीवनातली शेवटची अटेंप्ट आहे, असं समजू नका. कृपया छोट्या गोष्टीसाठी कोर्टात जाऊ नका. यामुळे अनेकांचं नुकसान होतं. पुढच्या भरतीवरही परिणाम होतो. आम्हीही चुका टाळण्याचा प्रयत्न करू…

वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच
वक्फ बिलाबद्दल ठाकरेंच्या शिवसेनेची भूमिका अस्पष्टच.
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले
जर बाळासाहेब असते तर तुम्ही..., श्रीकांत शिंदे संतापले.
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम
धसांच्या आरोपांवर किरण जाधवांनी बोलणं टाळलं, कॅमेरा बघताच ठोकली धूम.
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत
दाऊदचा उजवा हात म्हणून ओळख; टायगर मेमन पुन्हा का आला चर्चेत.
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर
अंबरनाथच्या बँकेत मनसेचा राडा; अमराठी बँक मॅनेजरला धरलं धारेवर.
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले
'नाहीतर आमची आवस्था...', सदाभाऊ काय म्हणाले की सगळेच पोट धरून हसले.
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक
अबीर गुलालच्या प्रदर्शनाचा मुद्दा पेटला; मनसे आक्रमक.
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?
कुणी पैसे काढून घेत असेल तर...लाडक्या बहिणींना पंकजाताई काय म्हणाल्या?.
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल
धनंजय देशमुख अजित पवारांच्या भेटीसाठी दाखल.
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार
दिशा सालियान प्रकरणाची सुनावणी मुंबई हायकोर्टात होणार.