पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा; देवेंद्र फडणवीस यांची कोणाकडे विनंती?
यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. अशातच भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी विनंती
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी विनंती राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्राला केली. अशी माहिती सूत्रांकडून मिळत आहे. पंकजा मुंडे यांना आणि OBC समाजाला प्रातिनिधीत्व देणं गरजेचं असल्याचेही देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. यंदाच्या लोकसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बीड लोकसभा मतदारसंघातून पराभव झाला. त्यानंतर पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवण्याची मागणी जोर धरू लागली आहे. पंकजा मुंडे यांचं काम चांगलं असून भाजप पक्षातील मोठ्या नेत्याही आहेत. त्यामुळे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना राज्यसभेवर पाठवा, अशी मागणी आता केली जात आहे. अशाप्रकारची विनंती देखील पक्षश्रेष्ठींकडे कऱण्यात आली आहे. राज्यसभा किंवा आता ज्या कोणत्या जागा रिक्त होतील, तेव्हा पंकजा मुंडेंची वर्णी लावावी, अशी विनंती फडणवीसांनी भाजपच्या वरिष्ठ पक्षश्रेष्ठींकडे केल्याची माहिती मिळत आहे.