ST कर्मचाऱ्यांच्या प्रश्नांवर मध्यममार्ग सुचवलाय, राज्य सरकारला निर्णय घ्यायचाय : देवेंद्र फडणवीस
एसटी कर्मचाऱ्यांबाबतची राज्यसरकारची भूमिका जीवघेणी आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग मी सुचवलाय, निर्णय राज्य सरकारला घ्यायचाय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी टीका करणारे टीका करतात काम करणारे काम करतात, असा टोला विरोधकांना लगावला आहे. पंतप्रधानांनी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेतला होता. लोकशाहीत कृषी कायदे मागे घेत अशा प्रकारचा निर्णय घेण्याचा मोठेपणा मोदींना दाखवलाय. जे टीका करतात, त्यांनी शेतकऱ्यांसाठी काहीच केलेलं नाही. टीकाकारांना जनताच उत्तर देईल, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. तर, एसटी कर्मचाऱ्यांबाबतची राज्यसरकारची भूमिका जीवघेणी आहे. कामगारांच्या अडचणी आणि विलीनीकरण याच्यातला मध्यममार्ग मी सुचवलाय, निर्णय राज्य सरकारला घ्यायचाय असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.
Latest Videos