बजेट सादर करणारेच आधी प्रतिक्रिया द्यायला आले, सत्ताधाऱ्यांच्या कृतीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

बजेट सादर करणारेच आधी प्रतिक्रिया द्यायला आले, सत्ताधाऱ्यांच्या कृतीवर देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

| Updated on: Mar 11, 2022 | 8:01 PM

महाराष्ट्राच्या सर्व घटकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारनं केलंय. हे बजेट महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणार काम होऊ शकत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.

विधानसभेत अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केल्यानंतर सत्ताधाऱ्यांनी तातडीनं सभागृहाबाहेर येत पत्रकारांशी संवाद साधला. सत्ताधाऱ्यांकडून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलले. यावेळी विरोधी पक्षनेत्यांना सत्ताधाऱ्यांचं बोलणं पूर्ण होईपर्यंत वाट पाहावी लागली. यावेळी विरोधकांनी घोषणाबाजी केली. यानंतर देवेंद्र फडणवीस माध्यमांशी बोलले. त्यांनी बजेट सादर झाल्यानंतर पत्रकारांशी विरोधी पक्ष संवाद साधतो. मात्र, यावेळी सत्ताधाऱ्यांनी अगोदर संवाद साधला, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले. महाराष्ट्राच्या सर्व घटकांच्या तोंडाला पान पुसण्याचं काम सरकारनं केलंय. हे बजेट महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणार काम होऊ शकत नाही. वृत्तपत्रात चौकट येतील अशा चार बातम्या होऊ शकतात.  आमच्या काळात सुरु असलेल्या योजना या बजेटमध्ये पुन्हा सांगण्याचं काम सुरु असल्याचं देवेंद्र फडणवीस म्हणाले.