राज्यपालांना टार्गेट करणं अयोग्य, ते संविधानाप्रमाणेच काम करतात : देवेंद्र फडणवीस

राज्यपालांना टार्गेट करणं अयोग्य, ते संविधानाप्रमाणेच काम करतात : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Mar 05, 2022 | 5:27 PM

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेचे 12 आमदार नेमण्याचा मंत्रिमंडळाचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारींवर महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून टीका करण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी विधान परिषदेचे 12 आमदार नेमण्याचा मंत्रिमंडळाचा अधिकार असल्याचं म्हटलं होतं. यावर देवेंद्र फडणवीस यानी भाष्य केलं आहे.जाणीवपूर्वक असंविधानिक कृती करायची आणि राज्यपालांविरोधात बोलायचं असं सुरु आहे. राज्यपाल एका संविधानिक पदावर बसलेली व्यक्ती आहे. ते संविधानाप्रमाणं काम करतात. त्यांच्यावर टीका करणं चुकीचं आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.ज्या प्रकारे सरकार कायदे करत आहे, दुरुस्त्या करत त्या असंविधानिक आहेत, त्यावर राज्यपालांनी बोट ठेवल्यास त्यांना टार्गेट केलं जातं, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.