विघ्नसंतोषींचा शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वाद, फडणवीसांडून शरद पवारांच्या ट्विटला दुजोरा

विघ्नसंतोषींचा शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वाद, फडणवीसांडून शरद पवारांच्या ट्विटला दुजोरा

| Updated on: Jun 07, 2023 | 9:10 AM

शिवराज्याभिषेकाचं हे 349 वं वर्ष आहे, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला. पुढच्या वर्षीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा 350 वा राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला गेलाय का? असा सवाल त्यांनी केलाय.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत '350 वा शिवराज्यभिषेक सोहळा असल्याचं म्हटलं आहे.

मुंबई: यंदाचा शिवराज्याभिषेक सोहळा 350 वा आहे की नाही यावर समाजमाध्यमांध्ये दावे-प्रतिदावे सुरु आहेत. शिवराज्याभिषेकाचं हे 349 वं वर्ष आहे, असा दावा इतिहास अभ्यासक इंद्रजीत सावंत यांनी केला. पुढच्या वर्षीच्या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून हा 350 वा राज्याभिषेक सोहळा म्हणून साजरा केला गेलाय का? असा सवाल त्यांनी केलाय.यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ट्वीट करत ‘350 वा शिवराज्यभिषेक सोहळा असल्याचं म्हटलं आहे. याच पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. काही विघ्नसंतोषी लोक शिवराज्याभिषेक सोहळ्यावरून वाद घालतात, अशी टीका देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. एका महाभागानं यंदा 350 वा शिवराज्याभिषेक नाही असं म्हटलं आहे, मात्र शरद पवारांनी 350 शिवराज्याभिषेक असं ट्वीट करत उत्तर दिलं आहे, असं फडणवीस यांनी म्हटलं.

Published on: Jun 07, 2023 09:10 AM