Devendra Fadnavis | सामना संपादकांचा केंद्रबिंदू बदलला, त्यांचे नेते राहुल, प्रियांका, सोनिया गांधी
शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली असून काँग्रेसची भलामण करण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे.
शिवसेनेचं मुखपत्रं असलेल्या दैनिक ‘सामना’तून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर टीका करण्यात आली असून काँग्रेसची भलामण करण्यात आली आहे. त्यावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर जोरदार हल्ला चढवला आहे. संजय राऊत यांचे नेतेच बदलल्याचा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. तसेच राऊत यांचे तीन नेते कोण यांची नावंही फडणवीसांनी सांगितली आहेत.
देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊत यांचं नाव न घेता त्यांना जोरदार कोपरखळ्या लगावल्या आहेत. सामना आणि सामनाच्या संपादकाचे केद्र बिंदू बदलले आहेत. त्यांचे नेते अलिकडच्या काळात सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी झाले आहेत. मला वाटतं तिच प्रचिती त्यांच्या अग्रलेखातून दिसत आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला.
Latest Videos