शपथविधी ठरला, देवेंद्र फडणवीस CM होणार पण 'गृहखात्या'वरून टक्कर अन् '2 नंबर'ची लढाई सुरू

शपथविधी ठरला, देवेंद्र फडणवीस CM होणार पण ‘गृहखात्या’वरून टक्कर अन् ‘2 नंबर’ची लढाई सुरू

| Updated on: Dec 01, 2024 | 9:46 AM

शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं होतं. मग आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर आमच्या उपमुख्यमंत्र्यासाठी गृहखातं सोडावं. म्हणजेच लढाई दोन नंबरच्या खुर्च्यासाठी सुरू आहे.

देवेंद्र फडणवीस यांचा नवीन मुख्यमंत्री म्हणून शपथविधी येत्या ५ डिसेंबर रोजी गुरूवारी संध्याकाळी पाच वाजता मुंबईतील आझाद मैदान येथे होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील या शपथविधीला उपस्थित राहणार आहे. मात्र अद्याप गृहखातं कोणाला मिळणार यावरून टक्कर कायम आहे. दरम्यान, देवेंद्र फडणवीस हे तिसऱ्यांदा मुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार असल्याचे आता निश्चित झाले आहे. मात्र अद्याप गृहखात्यावरून तोडगा निघालेला नाही. शिंदेंच्या शिवसेनेकडून स्पष्ट सांगण्यात आलं आहे की, शिंदे मुख्यमंत्री असताना देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृहखातं होतं. मग आता देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होत असतील तर आमच्या उपमुख्यमंत्र्यासाठी गृहखातं सोडावं. म्हणजेच लढाई दोन नंबरच्या खुर्च्यासाठी सुरू आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसच होणार आहे. त्यामुळे महायुतीच्या सरकारमध्ये नंबर वन हे देवेंद्र फडणवीसच असणार आहेत. तर अजित पवारांकडे अर्थ खातं देण्यास भाजपची समंती दर्शविली आहे. यासह नगरविकास खातं एकनाथ शिंदे यांच्याकडे देण्यास संमती दर्शविली आहे. गृहखातं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे राहणार असं बोललं जातंय. तर अर्थखातं अजित पवार यांच्याकडे दिलं जाणार असल्याने वजनदार खातं त्यांच्याकडे असणार आहे. असं झालं तर एकनाथ शिंदे सरकार तीन नंबरचे मंत्री होतील. त्यासाठी गृहखातं मिळावं या मागणीसह दोन नंबरवर कसे राहता येईल यासाठी प्रयत्न सुरू आहे.

Published on: Dec 01, 2024 09:45 AM