देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

देवेंद्र फडणवीसांचा नाव न घेता उद्धव ठाकरेंना टोला

| Updated on: Jul 04, 2022 | 3:45 PM

विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला.

विधानसभेत बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाव न घेता माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. “काही लोक इकडच्या लोकांना ईडी-ईडी म्हणून ओरडत होते. खरंच आहे, ही मंडळी ईडीमुळेच आली आहेत. फक्त ती ईडी म्हणजे एकनाथ आणि देवेंद्र आहे. एवढंच सांगतो, जेव्हा जेव्हा धनानंदाची सत्ता निरंकुश होते, तेव्हा तेव्हा कुठल्या तरी चाणक्याला चंद्रगुप्त शोधावा लागतो. त्यामुळे आज याठिकाणी हेच होताना दिसत आहे. एकदा सरकार बनल्यानंतर ती मोकळ्या मनाने स्वीकारली पाहिजे असं मला वाटतं. हनुमान चालिसा म्हटली की घर तोडणार, मी नशिबवान आहे. मी रोज सरकारच्या विरोधात बोललो तरी माझं घर तोडायला मुंबईत माझं घरच नाही. मी सरकारी घरातच राहतो. नागपूरचं जे घर आहे ते पूर्ण नियमात आहे”, असा टोला त्यांनी लगावला.

Published on: Jul 04, 2022 03:45 PM