राज्यात पुन्हा एकदा महायुती येणार? फडणवीसांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काय म्हणाल्या अमृता फडणवीस?
राज्याचे उपमुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण-पश्चिम विधानसभा मतदारसंघातून आपला उमेदवारी अर्ज भरला. देवेंद्र फडणवीस यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी देवेंद्र फडणवीसांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या घरी जात त्यांचे आशीर्वाद घेतले. यावेळी त्यांचे नितीन गडकरी यांच्या कुटुंबीयांकडून औक्षण देखील करण्यात आले. यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित होते.
देवेंद्र फडणवीस हे विधासभा निवडणुकीसाठी आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यावेळी देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस या देखील त्यांच्या सोबत होत्या. यावेळी त्यांनी संवाद साधला. ‘सलग सहाव्यांना देवेंद्र फडणवीस हे लोकसेवेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरत आहे. त्यामुळे खूप आनंद होत आहे. त्यामुळे त्यांना खूप शुभकामना… ‘,अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली. राज्यात आता भगवा फडकणार आहे. नागपूरमधील भाजप कार्यकर्त्यांमध्ये आणि नागपुरकरांमध्ये मोठा जल्लोष आहे. त्यामुळे यंदाच्या निवडणुकीनंतर भाजप प्रगतीचं राजकारण घेऊन परत फुलणार आहे, असे म्हणत अमृता फडणवीस यांनी भाजपच्या विजयावर भाष्य केले. तर राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार येणार असा विश्वासही अमृता फडणवीस यांनी व्यक्त केला. त्या पुढे असेही म्हणाल्या की, महायुती सर्वाधिक मताधिक्याने विजयी होईल. पूर्णपणे राज्यात भगवा फडकेल, असेही देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दावा केला.