देवेंद्र फडणवीस पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार

देवेंद्र फडणवीस पुणे मेट्रोच्या कामाची पाहणी करणार

| Updated on: Aug 06, 2021 | 6:52 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या पुणे मेट्रोची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचं कळतंय. गेल्या आठवड्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात आलं नव्हतं.पुण्यात सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या श्रेयवाद रंगला होता.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उद्या पुणे मेट्रोची पाहणी करण्यासाठी जाणार असल्याचं कळतंय. गेल्या आठवड्यात पुणे मेट्रोची ट्रायल रन घेण्यात आली होती. त्या कार्यक्रमाला देवेंद्र फडणवीस यांना बोलावण्यात आलं नव्हतं.पुण्यात सत्ताधारी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या श्रेयवाद रंगला होता. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते मेट्रोच्या ट्रायल रनला हिरवा कंदील दाखवला होता. पुण्यात यावरुन श्रेयवाद रंगला आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना बोलावलं नसल्यानं भाजप आणि चंद्रकांत पाटील यांनी टीका केली होती. उद्या देवेंद्र फडणवीस पुण्यात असल्याचं कळतंय. देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी पुण्यात असतील. शिवाजीनगर येथील मेट्रो स्टेशनच्या कामाची पाहणी देवेंद्र फडणवीस दुपारी 3 वाजता करतील, असं कळतंय.