Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतातच; चप्पल फेकण्यावर Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

| Updated on: Mar 06, 2022 | 8:32 PM

चप्पल फेकीच्या घटनेवर असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतातच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना (NCP) फटकारलं आहे. स्वतः काही करायचं नाही. त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत. आमच्या महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करून दाखवलं.

पिंपरी चिंचवड : पिंपरी चिंचवड (Pimpari Chinchwad) मधील भोसरी गावातील मारुती लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचं उद्घाटन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या हस्ते पार पडले. यावेळी फडणवीस आले त्यावेळी त्याची बैलगाडी मधून मिरवणूक काढण्यात आली. यानंतरच्या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी विविध मुद्यावर भाष्य केलं. चप्पल फेकीच्या घटनेवर असे फालतू लोकं, चिल्लर लोकं असतातच, अशा शब्दात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना (NCP) फटकारलं आहे. स्वतः काही करायचं नाही. त्यांच्या कार्यकाळात ते काहीच करू शकले नाहीत. आमच्या महापौर, नगरसेवक, पदाधिकाऱ्यांनी चांगलं काम करून दाखवलं. त्यामुळं त्यांच्या मनामध्ये असूया आहे, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले.