Tipu Sultan यांचा नामकरणाचा निर्णय रद्द झाला पाहिजे, Devendra Fadnavis यांची प्रतिक्रिया

| Updated on: Jan 26, 2022 | 6:55 PM

हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही. त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिका टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमामंडन करत आहे. हे त्वरीत थांबवलं गेलं पाहिजे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

नागपूर: मालाड येथील उद्यानाला टिपू सुलतान यांचे नाव देण्यात आले आहे. त्याला भाजपने जोरदार आक्षेप घेतला आहे. भाजपचे मुंबई महापालिकेतील (bmc) नेते या मुद्द्यावरून आक्रमक झाल्यानंतर शिवसेनेनेही टिपू सुलतानच्या नावाला विरोध केला आहे. महापालिकेतील या वादात आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (devendra fadnavis) यांनी उडी घेतली असून टिपू सुलता यांचं नाव उद्यानाला देण्यास तीव्र विरोध केला आहे. हिंदुंचा अनन्वित छळ करणारा टिपू सुलतान हा देश गौरव होऊच शकत नाही. त्यांचं नाव उद्यानाला देणं अयोग्य ठरेल, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबई महापालिका टिपू सुलतानचे नाव उद्यानाला देऊन त्यांचं महिमामंडन करत आहे. हे त्वरीत थांबवलं गेलं पाहिजे, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.