बिरोबा महाराज यात्रेतील पारंपारिक दशावतारी खेळ, बघा व्हिडीओ
VIDEO | 2 वर्षांनी बिरोबा महाराज यात्रा; बिरोबा महाराज यात्रेतील पारंपारिक दशावतारी खेळ बघण्यासाठी भाविकांची गर्दी
अहमदनगर : गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या निर्बंधामुळे गावोगावच्या यात्रा जत्रा थंडावल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्यातील कोल्हार गावातील देवाच्या सोंगाच्या आखाडीत मोठा जल्लोष बघायला मिळाला.राहुरी तालुक्यातील कोल्हार खुर्द येथे दरवर्षी गुढीपाडव्याच्या दिवशी बिरोबा महाराजांची यात्रा भरते.गेल्या दोन वर्षांपासून मात्र कोरोनामुळे यात्रेला खिळ बसली होती. महाराष्ट्र निर्बंधमुक्त झाल्यानंतर यात्रेला पुन्हा पुर्वीसारखी गर्दी होवू लागली आहे. गावकरी अतिशय आनंदाने यात्रेत सहभागी झाले. बिरोबा महाराजांच्या मानाच्या काठीची गावातून डफांच्या तालावर नाचत गाजत मिरवणूक पार पडली. नोकरीच्या निमित्ताने बाहेरगावी गेलेले नागरिक, गावच्या लेकी, सगेसोयरे या निमित्ताने गावात येतात आणि मोठ्या आनंदात यात्रा साजरी करतात.
Published on: Mar 23, 2023 05:46 PM
Latest Videos