Ayodhya Ram Mandir : २२ जानेवारीला राम मंदिराचं लोकार्पण, तर ‘या’ दिवसापासून जुन्या मंदिरातील दर्शन बंद
येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वीच अयोध्येतून मोठी बातमी समोर आली आहे. येत्या २० जानेवारीपासून जुन्या राम मंदिरातील दर्शन भाविकांना बंद करण्यात येणार आहे. रामभक्तांनी २२ जानेवारीला आपापल्या घरी, मंदिरात राम मंदिराचा उत्सव साजरा करावं, असं आवाहन राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आलं आहे.
अयोध्या, ११ जानेवारी, २०२४ : येत्या २२ जानेवारी रोजी अयोध्येत राम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. त्यापूर्वीच अयोध्येतून मोठी बातमी समोर आली आहे. येत्या २० जानेवारीपासून जुन्या राम मंदिरातील दर्शन भाविकांना बंद करण्यात येणार आहे. तसेच त्यानंतर २३ जानेवारीपासून नव्या राम मंदिरात दर्शन घेता येणार आहे. रामभक्तांनी २२ जानेवारीला आपापल्या घरी, मंदिरात राम मंदिराचा उत्सव साजरा करावं, असं आवाहन राम मंदिर ट्रस्टकडून करण्यात आलं आहे. अयोध्येत इमारतींना नव्याने रंग लावले जात आहे. अयोध्या नगरी नव्याने रेखाटली जात आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांना अयोध्या नगरीत आणि राम राज्यात आल्याचा भास व्हावा यासाठी रामांचे चित्र इमारतींवर रेखाटलं जात आहे. अयोध्येच्या मुख्य रस्त्यावर उभ्या असलेल्या इमारतींवर प्रभू श्रीरामांचे मोठमोठे प्रतिकृती तयार करण्यात आली आहेत.
Published on: Jan 11, 2024 11:54 PM
Latest Videos