Dhananjay Deshmukh : सरपंचाच्या खूनाची आरोपींकडून कबुली, धनंजय देशमुखांची पहिली प्रतिक्रिया; ‘…तोपर्यंत समाधानी नाही’
संतोष देशमुख हत्या प्रकरणात आरोपींनी चार महिन्यानंतर संतोष देशमुख यांचा खून केल्याची कबुली दिली. यानंतर आता धनंजय देशमुख यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाला चार महिने झालेत. या चार महिन्यानंतर बीड जिल्हा आणि सत्र न्यायालयात काल या प्रकऱणी कोर्टात सुनावणी पार पडली. दरम्यान, सुदर्शन घुले, जयराम चाटे आणि महेश केदार या आरोपींनी संतोष देशमुख यांचं अपहरण करून खून केल्याची कबुली दिली. यानंतर संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. संतोष देशमुख यांची हत्या झाल्याच्या पहिल्या दिवसापासून आम्ही सांगतो होतो, ज्यांनी कबुली दिली तेच आरोपी आहेत. खंडणी, खून अपहरण ही संघटित गुन्हेगारी असून हे त्यातील आरोपी आहेत. आरोपींनी चार महिन्यानंतर खूनाची कबुली दिली असली तरी न्यायासाठी आम्हाला संघर्ष करावा लागला, असे धनंजय देशमुख यांनी स्पष्ट केले. दरम्यान, आरोपींनी कबुली दिल्यानंतर धनंजय देशमुखांना समाधानी आहात का असा सवाल केला असता त्यांनी थेट म्हटलं आम्ही समाधानी म्हणणे घाईचे होईल. तर जोपर्यंत सर्व आरोपींना फाशीची शिक्षा होत नाही. तोपर्यंत समाधानी म्हणणे घाईचे होईल, असे म्हणत त्यांनी आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली.