‘वडिलांचा एकही अवयव शाबूत नव्हता, फक्त तीन हाडं…’, नामदेव शास्त्रींपुढं बापासाठी लेक ढसाढसा रडली
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हे आज भगवानगड येथे दाखल होत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली.
सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख आणि संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हे भगवानगडावर दाखल होत त्यांनी महंत नामदेव शास्त्री यांची भेट घेतली. यावेळी वैभवी देशमुख हिने नामदेव शास्त्रींना थेट सवाल केल्याचे पाहायला मिळाले. ‘दादा तुम्ही मोठे आहात. तुमच्याकडे न्यायासाठी आलोय. एक चापटी मारली त्यांची मानसिकता काय आहे हे तुम्ही म्हणाला. आज वडिलांच्या अंगावर इतके वार झाले. त्यांचं एकही अवयव नाही की तो शाबूत होता. त्यांच्या अस्थित तीन हाडे निघाली. आमची मानसिकता काय असेल. त्यांचे फोटो बघवत नाही. याचं दुख आहे. तुम्ही आमचे विचार, आमची बाजू, कारण काय, घटना काय एवढंच आमचं एकदा ऐकायला हवं होतं’, असं ती म्हणाली. तर आरोपींचं समर्थन करायचं करा. आमचा विरोध नाही. पण आरोपींची पाठराखण केली जात आहे. माझ्या वडिलांनी कधीच जातीयवाद केला नाही. जो माणूस दलितांना वाचवण्यासााठी गेला. त्याने जातीवाद केला नाही. त्याला न्याय देताना वेगवेगळे फाटा का फोडले जात आहे. आता कुणाला वाचवायला जाणं हा गुन्हा आहे का हा प्रश्न आहे. आम्हाला न्याय मिळावा ही आमची अपेक्षा असल्याचेही तिने म्हटलं. दरम्यान, यावर नामदेव शास्त्री म्हणाले, आरोपींना माफ करणार नाही. आम्ही आरोपीला पाठी घालत नाही. बाबाच्या गादीवर बसून शब्द देतो. आरोपीच्या पाठी भगवान गड नाही. संतोष देशमुख यांच्या कुटुंबाच्या मागे भगवान गड राहणार आहे. तुम्ही चिंता करू नका. तुम्ही गडाचे आहात. कुठे तरी जातीय रंग दिला आहे.

धमकीच्या ऑडिओ क्लिपमधला आवाज माझाच - संदीप क्षीरसागर

रात्री 10 ते पहाटे 6 पर्यंत सर्व धार्मिक स्थळांवरील भोंगे बंद ठेवा..

शिंदेंच्या काळातल्या योजनांना कात्री? अर्थसंकल्पात निधीची तरतूद नाही

न्यायदान कक्षातच रंगतात ओल्या पार्ट्या, Video व्हायरल
