Dhananjay Munde : मुंडेंचा शिरूर कासारचा दौरा रद्द, याच दौऱ्यात धस आणि मुंडे एकत्र दिसणार होते
Dhananjay Munde Visit Cancelled : बीडच्या शिरूर कासारमध्ये होणाऱ्या भगवानबाबा गडाचा नारळी सप्ताह कार्यक्रमाचा माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा दौरा रद्द झाला आहे.
माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा बीडच्या शिरूर कासारमधल्या पिंपळगावचा दौरा आता रद्द झालेला आहे. संत भगवानबाबा गडाचा नारळी सप्ताह या ठिकाणी होणार आहे. त्याच सप्ताहात मुंडे उपस्थिती लावणार होते. मात्र तांत्रिक कारणामुळे हेलिकॉप्टर उड्डाणास परवानगी न मिळाल्याने आता हा दौरा रद्द करण्यात आलेला आहे. याबद्दल खुद्द धनंजय मुंडे यांनी ट्विट करून माहिती दिली आहे.
याच कार्यक्रमात आमदार सुरेश धस आणि धनंजय मुंडे एकत्र येणार होते. संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर पहिल्यांदाच हे दोन्ही नेते एकत्र एका मंचावर दिसणार होते. त्यामुळे या कार्यक्रमाकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं होतं. आमदार सुरेश धस यांनी सप्ताहात हजेरी लावत महंत नामदेव शास्त्री यांचं दर्शन घेऊन परतीचा प्रवास सुरू केला आहे. तर धनंजय मुंडे यांचा हा दौराच रद्द झाला आहे. हेलिकॉप्टरचं उड्डाण न झाल्याने हा दौरा रद्द झाला असल्याची माहिती स्वत: धनंजय मुंडे यांनी आपल्या एक्स अकाऊंटवर ट्विट करून दिली आहे.

गंगा एक्सप्रेसवेवर हवाई दलाच्या एअरशोमध्ये राफेल-जॅग्वारचा दिसला स्वॅग

इमरान खान जेलमधून सुटणार? 34 लाख ट्विट्स अन् समर्थकांकडून एकच मागणी

पाकचे लष्करप्रमुख असिम मुनीर राजीनामा देणार? कोणाकडून होतेय मागणी?

भारताचा डिजिटल स्ट्राईक; पाकला दाखवली जागा, भल्या-भल्यांना भारतात बॅन
