‘महायुती सोडून गेले पण मुलीला…’, धनंजय मुंडेंचा रोख नेमका कुणावर?
महायुतीतून बाहेर पडणाऱ्यांना थांबण्याचा प्रयत्न केला पण महायुती सोडून गेले पण मुलीला निवडून आणता आलं नाही, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी नाव न घेता बजरंग सोनवणे यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली. बघा नेमकं काय म्हणाले धनंजय मुंडे?
गेल्या चार दिवसांपूर्वी बीडमध्ये शरद पवार यांनी मोठी खेळी केल्याचे पाहायला मिळाले. बीडमध्ये अजित पवार गटातील बजरंग सोनवणे यांनी शरद पवार गटात प्रवेश केला. दरम्यान, बजरंग सोनवणे यांच्यावर धनंजय मुंडे यांनी अप्रत्यक्षपणे टीका केली. महायुतीतून बाहेर पडणाऱ्यांना थांबण्याचा प्रयत्न केला पण महायुती सोडून गेले पण मुलीला निवडून आणता आलं नाही, असं वक्तव्य धनंजय मुंडे यांनी केलं असून नाव न घेता बजरंग सोनावणे यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘महायुतीतून कोण गेले आणि ते कशामुळे गेले याची कारणं शोधली पाहिजे. गेल्या मागच्या वेळी आम्ही आघाडी म्हणून ज्याची कामं केलीत, त्यांची काय ऐपत आहे त्यांना स्वतःच्या मुलीला देखील निवडून आणता आलं नाही. त्यांच्या ग्रामपंचायतीमध्ये सुद्धा निवडून आणता आलं नाही. आता कोण उमेदवार येतं ते पाहावं लागेल आता कोण उमेदवार येणार हे पाहवं लागेल.’, असं धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.