निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

निवडणूक आल्यानंतर ऊसतोड कामगार आठवतात; धनंजय मुंडेंचा पंकजांना टोला

| Updated on: Dec 19, 2021 | 2:07 PM

नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी उडाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाऊ-बहिण आमने सामने आले आहेत.

बीड : नगरपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. प्रचाराची रणधुमाळी उडाली असून, आरोप-प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. नगरपंचायत निवडणुकीच्या निमित्ताने बीड जिल्ह्यात पुन्हा एकदा धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे भाऊ-बहिण आमने सामने आले आहेत. धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे आणि भाजपावर जोरदार टीका केली आहे. भाजपाला नगरपंचायत निवडणूक लढवायला साधा उमेदवार मिळत नसल्याची टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.  आजही बीड जिल्ह्याची ओळख ही ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून आहे. 12 डिसेंबर 2014 साली गोपीनाथ मुंडे यांच्या नावाने ऊसतोड महामंडळाची निर्मिती करण्याची घोषणा करण्यात आली होती. मात्र पाच वर्ष सत्ता असतानाही महामंडळाची निर्मिती करता आली नाही. या काळात महामंडळ दोनदा रद्द झाले. सत्ता गेल्यानंतरच ऊसतोड कामगारांची आठवण होते, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.