'पुण्यातील MCA च्या स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या', कुणी केली मागणी?

‘पुण्यातील MCA च्या स्टेडियमला शरद पवार यांचं नाव द्या’, कुणी केली मागणी?

| Updated on: Jun 17, 2023 | 7:19 AM

VIDEO | राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याची केली पुण्यातील एमसीए गहुंजेमधील क्रिकेट स्टेडियमला शरद पवारांचं नाव द्या, अशी मागणी

पुणे : पुण्यातील गहुंजे येथील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानास बीसीसीआय व आयसीसीचे माजी अध्यक्ष,  पद्मविभूषण खासदार  शरदचंद्रजी पवार साहेब  यांचे नाव देण्याची मागणी माजी मंत्री आमदार धनंजय मुंडे यांनी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आमदार रोहितदादा पवार यांच्याकडे केली आहे. एमपीएल स्पर्धेत धनंजय मुंडे यांच्या मालकीचा छत्रपती संभाजी किंग्स हा मराठवाड्याचा संघ सहभागी झाला आहे. या संघाच्या सामन्यांच्या पार्श्वभूमीवर धनंजय मुंडे यांनी ही मागणी केली आहे. मुंबई क्रिकेट असोसिएशन, बीसीसीआय त्याचबरोबर आयसीसीचे अध्यक्ष राहिलेल्या पद्मविभूषण खासदार शरदचंद्र पवार यांचे क्रीडा विश्वात व विशेष करून क्रिकेटमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान आहे. भारतीय महिला क्रिकेटला आंतरराष्ट्रीय दर्जा मिळवून देणे, देशासाठी खेळलेल्या निवृत्त क्रिकेटर्सला पेन्शन सुरू करणे यासारखे मोठे निर्णय पवार साहेबांच्या कारकिर्दीत होऊ शकले, याचाही उल्लेख धनंजय मुंडे यांनी आपल्या पत्रात केला आहे.

Published on: Jun 17, 2023 07:19 AM