धनंजय मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? अजितदादांनी घेतली अमित शहांची भेट, दिल्लीत फैसला होणार?
मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांसह महायुती सरकारमधील दोन आमदार आक्रमक झाल्यानंतर अजित पवार दिल्लीत आलेत. यावेळी अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची बैठक घेतली. या भेटीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा.,...
सरकार असेल किंवा अजित पवार यांच्यावर मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या दबाव वाढलाय. त्यातच अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची भेट घेतली. तर दुसरीकडे मंत्रिपद वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी लॉबिंग सुरू केलं असल्याची माहिती मिळतेय. मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी विरोधकांसह महायुती सरकारमधील दोन आमदार आक्रमक झाल्यानंतर अजित पवार दिल्लीत आलेत. यावेळी अजित पवार यांनी दिल्लीत अमित शाह यांची बैठक घेतली. या भेटीत धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर चर्चा झाल्याची माहिती आहे. यापूर्वी पंकजा मुंडे आणि बजरंग सोनावणे यांनी अमित शाह यांची भेट घेतली होती. पकंजा मुंडे यांनी घेतलेली भेट ही सदिच्छा भेट असल्याचे म्हटलं असलं तरी बजरंग सोनावणे यांनी आपण बीडचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणात कारवाईची मागणी करण्यासाठी भेट घेतली असल्याची म्हटलं. राजीनाम्यासाठी दबाव वाढल्यानंतर मंत्रिपदाची खुर्ची वाचवण्यासाठी धनंजय मुंडे यांनी लॉबिंग सुरू केली आहे. धनंजय मुंडे यांनी कोणा-कोणाची घेतली भेट? बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट