राजीनाम्यावरुन दबाव? धनंजय मुंडे तडकाफडकी अजितदादांच्या भेटीला, चर्चेत नेमकं काय ठरलं?
सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील केली. त्यानंतर तडकाफडकी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली.
बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणासंदर्भात मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यासाठी आता दबाव वाढतोय. सर्वपक्षीय नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतली. यावेळी त्यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी देखील केली. त्यानंतर तडकाफडकी धनंजय मुंडे यांनी अजित पवार यांची भेट घेतली. राजीनाम्यावरून दबाव वाढल्यानंतर धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची मंत्रालयातील दालनात भेट घेतली. यावेळी अजित पवारांनी धनंजय मुंडे यांच्याकडून बीड प्रकरणाचा आढावा घेतल्याची माहिती आहे. यासोबतच हत्येनंतर विरोधकांच्या राजीनाम्याच्या मागणीवरही चर्चा झाली. दादांनी परळीतील राजकीय परिस्थितीचाही आढावा घेतला. बीडचं पालकमंत्रिपद राष्ट्रवादीकडे आलंय. त्यावरून काय करायचं, याचीही चर्चा झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळतेय. आतापर्यंत सर्वपक्षीय मोर्च्यातून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी झालीय, मात्र भाजपचे आमदार सुरेश धस, संभाजी राजे, विजय वडेट्टीवार यांच्यासह बीडच्या लोकप्रतिनीधींनी राज्यपालांकडे धनंजय मुंडेंचा राजीनामा घेण्याची मागणी केलीय. त्यामुळे धनंजय मुंडे मंत्रिमंडळात राहणार की आपला राजीनामा देणार हे पाहणं महत्वाचं असणार आहे.