धनंजय मुंडे यांची क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री; कुठं होणार महाराष्ट्र प्रीमिअर लीग?
VIDEO | धनंजय मुंडे यांची क्रिकेटच्या मैदानात एन्ट्री, बघा क्रिकेटच्या मैदानावरील कूल-लूक
पुणे : पुण्यात आयपीएलच्या धर्तीवर महाराष्ट्र प्रीमिअर लीग (एमपीएल) क्रिकेट स्पर्धांचे 15 ते 29 जून दरम्यान महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने आयोजन केले आहे. महाराष्ट्राच्या सहा विभागातील सहा संघ या लीगमध्ये खेळणार आहे. मराठवाड्याचा छत्रपती संभाजी किंग्स हा संघ मराठवाड्याचे प्रथमच प्रतिनिधित्व करणार आहे. छत्रपती संभाजी किंग्स या संघाची फ्रंचाईजी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार धनंजय मुंडे यांच्या सहकाऱ्यांच्या व्यंकटेश्वरा इंडस्ट्रीज प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने घेतली आहे. नेहमी राज्याच्या राजकारणात सक्रिय असणाऱ्या धनंजय मुंडे यांनी यानिमित्ताने प्रथमच राज्य स्तरावरील क्रिकेट विश्वातही पदार्पण केले आहे.धनंजय मुंडे यांचा क्रिकेटच्या मैदानावरील कुल-लूक तुम्ही पाहिलात का?
Published on: Jun 09, 2023 01:20 PM
Latest Videos