Dhananjay Munde : धनंजय मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर स्पष्टच म्हणाले, ‘योग्य वेळी…’
खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड हाच या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होतोय. अशातच काल धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची तडकाफडकी भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे.
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव वाढत चालला आहे. या प्रकरणतील मुख्य तीन आरोपींपैकी दोन आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. तर एक अद्याप फरार आहे. खंडणी प्रकरणात अटकेत असलेला वाल्मिक कराड हाच या हत्येमागचा मुख्य सूत्रधार असल्याचा आरोप होतोय. अशातच काल धनंजय मुंडे यांनी अजित पवारांची तडकाफडकी भेट घेतली. या भेटीनंतर धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिल्याची चर्चा आहे. धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर टीव्ही ९ मराठीच्या प्रतिनिधीने सवाल केला असता. धनंजय मुंडे यांनी स्पष्ट आपली प्रतिक्रिया दिली. ‘मी काही राजीनामा वैगरे दिलेला नाही, मी जर राजीनामा दिला असता तर मी कॅबिनेटच्या मीटिंगला कसा आलो असतो?’ असं धनंजय मुंडे म्हणाले आणि राजीनाम्यावर अधिक प्रतिक्रिया देण्याचे टाळल्याचे पाहायला मिळाले. तर दुसरीकडे भाजप आमदार सुरेश धस हे सातत्याने धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेण्याची मागणी करताय इतकंच नाहीतर ते बीज संतोष देशमुख हत्या प्रकरणात धनंजय मुंडे यांच्यावर आरोपही करताना दिसताय. यावरही धनंजय मुंडे यांनी भाष्य केले आहे. ‘सुरेश धसांना आरोप करू द्या…सुरेश धसांच्या आरोपावर योग्य वेळी उत्तर देईल’, असे धनंजय मुंडे म्हणालेत.