Dhananjay Munde | शेतकऱ्यांच्या बांधावर असताना पंकजा मुंडे अमेरिकेत, धनंजय मुंडेंचा टोला
धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी पंकजा मुंडे यांच्या टीकेला उत्तर दिलं आहे. “त्याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात 11 वेळा ढगफुटी झाली. त्या प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आताच्या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. रात्री अनेक लोकांना पुरातून आम्ही बाहेर काढले” असं धनंजय मुंडे म्हणाले.
जिल्ह्याला वाऱ्यावर सोडून पालकमंत्री पुण्याला गेले या भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या टीकेला राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी उत्तर दिलं आहे. “त्याच अनेक दिवस अमेरिकेत गायब होत्या. त्यांना माहित नाही या पावसाळ्यात बीड जिल्ह्यात 11 वेळा ढगफुटी झाली. त्या प्रत्येकवेळी आम्ही शेतकऱ्यांच्या बांधावर होतो. आताच्या अतिवृष्टीतही मी मंत्रीमंडळ बैठकीला हजर न राहता बीडमध्ये रात्री लोकांच्या मदतीसाठी गेलो होतो. रात्री अनेक लोकांना पुरातून आम्ही बाहेर काढले” असं धनंजय मुंडे म्हणाले.
गेल्या 15 दिवसात जवळपास 4 वेळा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली, वाण नदी सारख्या नदी काठच्या गावांचे यामुळे शेतीसह, घरे, पशु असे प्रचंड नुकसान झाले. निसर्ग कोपला असला तरीही कुणाचेही घर-संसार उघड्यावर पडू देणार नाही, शासनाच्या माध्यमातून प्रत्येक नुकसानग्रस्त नागरिकाला पुन्हा उभारण्याचे काम केले जाईल, असं आश्वासन धनंजय मुंडे यांनी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांना दिलं आहे.