बीड जिल्ह्याची बदनामी करु नका, धनंजय मुंडे यांचं विरोधकांना आवाहन
सर्वात आधी भारतीय जनता पार्टीने बीड जिल्ह्याची बदनामी केली. माजी पालकामंत्र्यांनी ज्या पद्धतीने पत्र लिहिले खऱ्या अर्थाने बीड जिल्हा इथेच बदनाम झाला, असं धनंजय मुंडे म्हणाले.
मी धनंजय मुंडे म्हणून काम करत नसेल तर धनंजय मुंडेंला वाट्टेल तसं बदनाम करा मात्र बीड जिल्ह्याला बदनाम करू नका. बीड जिल्हा बिहार बीड जिल्ह्याला मागास म्हणून माझ्या जिल्ह्याची बदनामी करू नका, अशी परखड टीका मंत्री धनंजय मुंडे यांनी भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्यावर केली आहे. सर्वात आधी भारतीय जनता पार्टीने बीड जिल्ह्याची बदनामी केली. माजी पालकामंत्र्यांनी ज्या पद्धतीने पत्र लिहिले खऱ्या अर्थाने बीड जिल्हा इथेच बदनाम झाला. दरम्यान निलेश राणेंनी शरद पवार यांच्यावर दाऊदचा माणूस म्हणून शंका व्यक्त केली होती, यावेळी कोण निलेश राणे अशी प्रतिक्रिया मंत्री धनंजय मुंडे यांनी माध्यमांशी बोलताना दिलीय.
Latest Videos