Beed Case : धनंजय मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्...

Beed Case : धनंजय मुंडे यांनीच 3 कोटींची खंडणी मागितली, सुरेश धसांचा खळबळजनक आरोप अन्…

| Updated on: Jan 07, 2025 | 10:17 AM

टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखती सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी पवनचक्कीचं खंडणी प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आहे. १४ जूनला मुंबईतील सातपुडा बंगल्यावर पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडून धनंजय मुंडे यांनी तीन कोटी रूपये मागितले

संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी पवनचक्कीचं खंडणी प्रकरण जुळलेलं आहे. ही खंडणी धनंजय मुंडे यांनी त्यांच्या सातपुडा या सरकारी बंगल्यावर मागितल्याचा आरोप भाजपचे आमदार सुरेश धस यांनी केलाय. टीव्ही ९ मराठीला दिलेल्या मुलाखती सुरेश धस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाशी पवनचक्कीचं खंडणी प्रकरणात थेट धनंजय मुंडे यांचं नाव घेतलं आहे. १४ जूनला मुंबईतील सातपुडा बंगल्यावर पवनचक्कीच्या आवादा कंपनीकडून धनंजय मुंडे यांनी तीन कोटी रूपये मागितले आणि त्या बैठकीत स्वतः धनंजय मुंडे होते, असा दावा सुरेश धस यांनी केलाय. खंडणीचं जे प्रकरण संतोष देशमुख यांच्या हत्येशी जोडलं जातंय त्या खंडणीची ३ कोटींची डील धनंजय मुंडे यांच्या सातपुडा बंगल्यावर झाल्याचा सनसनाटी आरोपही सुरेश धस यांनी केलाय. या बैठकीत आका वाल्मिक कराडसह नितीन बिक्कड याचं नावही सुरेश धसांनी घेतलंय. मात्र नितीन बिक्कड याने सर्व आरोप फेटाळले असून खंडणीशी आपला संबंध नसल्याचे म्हटले आहे. २५ जूनला धनंजय मुंडे यांना स्वतःच्या कामासाठी भेटलो, असं नितीन बिक्कड याने म्हटलंय. हे सर्व आरोप नितीन बिक्कड याने फेटाळल्यानंतर चौकशीतून सर्व समोर येईल असं सुरेश धस यांनी म्हटलंय. बघा या संदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Jan 07, 2025 10:17 AM