मी निष्क्रिय खासदार मग मोदींची माझ्याविरोधात… ओमराजे निंबाळकरांचा पंतप्रधानांवर निशाणा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाराशिव येथील जाहीर सभेआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मी निष्क्रिय खासदार आहे. माझं काम काहीच नाही मग माझ्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा कशासाठी घेत आहेत? ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांचा थेट सवाल
मी निष्क्रिय खासदार मग पंतप्रधान नरेंद्र मोदी माझ्या विरोधात सभा का घेतात? असा सवाल ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी करत मोदींवरच निशाणा साधला आहे. धाराशिवमध्ये आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची सभा होती, त्यावरून ठाकरे गटाचे धाराशिवचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी हा सवाल केलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या धाराशिव येथील जाहीर सभेआधीच राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. मी निष्क्रिय खासदार आहे. माझं काम काहीच नाही मग माझ्या विरोधात पंतप्रधान नरेंद्र मोदीची सभा कशासाठी घेत आहेत? असा सवाल उपस्थित करत ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी नरेंद्र मोदी यांच्या सभेवर सवाल उपस्थित करत अशी खोचक टीका केली असल्याचे पाहायला मिळाले. बघा व्हिडीओ काय केला नरेंद्र मोदी यांच्यावर हल्लाबोल?
Published on: Apr 30, 2024 05:46 PM
Latest Videos