Dhirendra Shastri : मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र बनणार नाही – धीरेंद्र शास्त्री महाराज
Dhirendra Shastri On Chhatrapati Shivaji Maharaj : धीरेंद्र शास्त्री महाराजांनी आपल्या प्रवाचनातून बोलताना छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराजांचं कौतुक केलं आहे.
मुस्लिमांना शिव्या देऊन हिंदू राष्ट्र बनणार नाही, असं धीरेंद्र शास्त्री महाराजांनी म्हंटलं आहे. छत्रपती संभाजीराजेंसारखे मुलांवर संस्कार करा, असं देखील धीरेंद्र शास्त्री यांनी म्हंटलं आहे. छत्रपती संभाजीराजेंनी प्राण त्यागले, पण धर्म सोडला नाही, असं म्हणत धीरेंद्र शास्त्री यांनी संभाजीराजेंची स्तुती केलेली आहे.
आपल्या प्रवचनात बोलताना धीरेंद्र शास्त्री म्हणाले की, मुस्लिम समाजाला शिव्या देऊन आपण कधीही हिंदू राष्ट्र बनवू शकणार नाही. आपल्याला आपल्या मुलांना चांगले संस्कार द्यावे लागतील. आपल्याला आपल्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराजांसारखे संस्कार द्यावे लागतील. औरंगजेबाने सगळे पर्याय वापरुन पहिले तरी त्यांना छत्रपती संभाजी महाराजांचं धर्म परिवर्तन त्यांना करता आलं नाही. संभाजीराजेंनी प्राण त्यागले, पण धर्म सोडला नाही, असं धीरेंद्र शास्त्री म्हणाले.

युद्धाची पूर्व तयारी, गृहमंत्रालयाचे सर्व राज्यांना आदेश; 7 मे रोजी...

पाक पंतप्रधान गायब, पत्रकाराचा सवाल अन् उपपंतप्रधानांचं उत्तर बघा काय

मुंबईकरांनो... तुम्ही बेस्ट बसने प्रवास करतात? तुमच्यासाठी मोठी बातमी

वैभवी देशमुखला मुख्यमंत्र्यांचं पत्र अन् बारावीचे गुण कळताच म्हणाले...
