Bageshwar Baba : ... म्हणून मी तुकारामांबद्दल तसं बोललो, तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन बागेश्वर बाबांची क्षमायाचना

Bageshwar Baba : … म्हणून मी तुकारामांबद्दल तसं बोललो, तुकाराम महाराजांचं दर्शन घेऊन बागेश्वर बाबांची क्षमायाचना

| Updated on: Nov 22, 2023 | 12:21 PM

गेल्या काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर चांगलाच वाद रंगला. अशातच बागेश्वर बाबांनी देहूतील मंदिरात येऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही त्यांनी केले भाष्य

पुणे, २२ नोव्हेंबर २०२३ : गेल्या काही दिवसांपूर्वी बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते. यानंतर चांगलाच वाद रंगला होता. अशातच बागेश्वर बाबांनी देहूतील मंदिरात येऊन संत तुकाराम महाराजांचे दर्शन घेतले. यावेळी त्यांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्यावरही भाष्य केले आहे. बागेश्वर बाबा म्हणाले, मी एक लेख वाचला होत. माझ्या वाचनात आल्यानं मी संत तुकाराम यांच्याबाबत तसं बोललो. तसं पाहायला गेलं तर मी यापूर्वीही महाराष्ट्रात येऊन गेलो आहे. संत तुकाराम महाराज, संत ज्ञानेश्वर महाराज यांच्याबद्दल मी वाचले आहे मी कोणत्याही संताबद्दल चुकीचं वक्तव्य केले नाही, असेही बागेश्वर बाबांनी म्हटले आहे. दरम्यान, पुण्यात आज माध्यमांशी बोलताना बागेश्वर बाबांनी संत तुकाराम महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्याबाबत माफी मागत ते देवाचं रूप असल्याचे म्हटले आहे.

Published on: Nov 22, 2023 12:17 PM