सुषमा अंधारे यांच्या प्रकरणानंतर अंर्तगत वाद चव्हाट्यावर; निलंबनानंतर धोंडू पाटील म्हणताय, 'मी उद्धव ठाकरेंकडे...'

सुषमा अंधारे यांच्या प्रकरणानंतर अंर्तगत वाद चव्हाट्यावर; निलंबनानंतर धोंडू पाटील म्हणताय, ‘मी उद्धव ठाकरेंकडे…’

| Updated on: May 19, 2023 | 1:06 PM

VIDEO | बीडमध्ये सुषमा अंधारे यांना मारहाण? धोंडू पाटील यांची ठाकरे गटातून हकालपट्टी, निलंबनानंतर धोंडू पाटील म्हणाले...

नांदेड : बीड जिल्ह्यातील ठाकरे गटाच्या शिवसेनेत अंतर्गत गटबाजी आणि मारहाणीचे प्रकार समोर आले आहे. ठाकरे गटाची महाप्रबोधन यात्रा उद्या बीडमध्ये होणार आहे. या यात्रेमध्ये संजय राऊत आणि सुषमा अंधारे यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र या सभेपूर्वीच ठाकरे गटातील अंतर्गत वाद चव्हाट्यावर आला आहे. गुरूवारी या सभेच्या निमित्ताने सुषमा अंधारे सभा स्थळाची पाहणी करण्यासाठी बीडमध्ये आल्या होत्या. यावेळी जिल्हाप्रमुख आप्पासाहेब जाधव यांच्यासह सुषमा अंधारे यांचा वाद झाला. यानंतर आप्पासाहेब जाधव यांनी सुषमा अंधारे यांच्यावर गंभीर आरोप केलेत आणि एकच खळबळ उडाली. यानंतर उद्धव ठाकरे यांच्याकडून मोठी कारवाई करत आप्पासाहेब जाधव आणि धोंडू पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली. या कारवाईनंतर जिल्हासंपर्क प्रमुखपदी असलेल्या धोंडू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, माझ्या समक्ष मारहाणीचा काही प्रकार घडला नाही. मात्र कार्यकर्ते आणि सुषमा अंधारे यांच्यात कुरबुर सुरू होती. पण यादरम्यान मला पक्षातून का काढून टाकले, याबाबत मी उद्धव ठाकरे यांच्याकडे दाद मागणार आहे. सुषमा अंधारे यांचं मूळ गाव असल्याने त्यांचा बीड जिल्ह्यात हस्तक्षेप वाढला होता. त्यातून कुरबुरी झाल्याने हा प्रकार घडला असावा असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.

Published on: May 19, 2023 01:06 PM