Ladki Bahin Yojna : 'लाडक्या बहिणी'नं योजनेचे मिळालेले पैसे स्वतःहून केले परत, पण का? धुळ्यात नेमकं काय घडलं?

Ladki Bahin Yojna : ‘लाडक्या बहिणी’नं योजनेचे मिळालेले पैसे स्वतःहून केले परत, पण का? धुळ्यात नेमकं काय घडलं?

| Updated on: Jan 05, 2025 | 1:13 PM

महिलेचे जॉईंट अकाऊंट अस्याने मुलाच्या खात्यात योजनेचे पैसे आलेत. मात्र धुळ्याच्या नकाने गावातील महिलेने आलेले लाडक्या बहीण योजनेचे पैसे परत केल्याचे समोर आले आहे.

लाडकी बहीण योजनेचे निकष डावलून लाभ घेतलेल्या प्रकरणासंदर्भात एक बातमी समोर आली आहे. धुळ्यातील नकाने गावातील एका महिलेच्या मुलाच्या खात्यात लाडकी बहीण योजनचे पैसे आल्याचे पाहायला मिळाले होते. महिलेचे जॉईंट अकाऊंट अस्याने मुलाच्या खात्यात योजनेचे पैसे आलेत. मात्र धुळ्याच्या नकाने गावातील महिलेने आलेले लाडक्या बहीण योजनेचे पैसे परत केल्याचे समोर आले आहे. पडताळणीनंतर महिलेने योजनेचे खात्यात जमा झालेले ७ हजार ५०० रूपये परत केले आहे. भिकूबाई खैरनार नावाच्या महिलेने या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज भरला पण त्यांच्या खात्यात पैसे न येता त्यांच्या मुलाच्या खात्यात पैसे जमा झाल्याचे पाहायला मिळाले. मात्र या महिलेने स्वतः पुढे येऊन ही चूक मान्य केली आणि आतापर्यंत मिळालेले सर्व पैसे शासनाकडे परत केले. भिकूबाई यांनी चुकून त्यांच्या मुलाचे आधार कार्ड दिल्याने, त्या आधार कार्ड ला लिंक असलेल्या बँक अकाउंट मध्ये पैसे आले होते त्यामुळे शासनाने टाकलेल्या साडेसात हजार रुपये हे त्यांच्या मुलाच्या बँक खात्यामध्ये जमा झाल्याचे या महिलेने सांगितले.

Published on: Jan 05, 2025 01:13 PM