Nandurbar Election | नंदुरबार झेडपीसाठी दुपारी 1.30 पर्यत 42.55 % मतदान

Nandurbar Election | नंदुरबार झेडपीसाठी दुपारी 1.30 पर्यत 42.55 % मतदान

| Updated on: Oct 05, 2021 | 5:17 PM

धुळे जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 जागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला दोन जागांची आवश्यकता आहे.

धुळे जिल्हा परिषदेच्या 15 आणि पंचायत समितीच्या 30 जागांसाठी मतदान पार पडत आहे. धुळे जिल्हा परिषदेवर भाजपची सत्ता होती. जिल्हा परिषदेच्या एकूण 56 जागांपैकी भाजपकडे 27 झागा आहेत. तर शिवसेनेकडे 2, राष्ट्रवादी काँग्रेसकडे 3 आणि काँग्रेसकडे 6 जागा आहेत. बहुमत सिद्ध करण्यासाठी भाजपला दोन जागांची आवश्यकता आहे. त्यामुळे धुळे जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा भाजपचा झेंडा फडकणार असा दावा भाजप उमेदवार आणि गुजरातचे भाजप प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील यांच्या कन्या धरती देवरे यांनी केलाय. दुसरीकडे नंदुरबार झेडपीसाठी दुपारी 1.30 वाजेपर्यंत 42.55 % मतदान झाले आहे.

दरम्यान नागपुर जिल्हा परिषदेच्या 16 मतदारसंघांसाठी तर पंचायत समितीच्या 31 मतदारसंघांसाठी उद्या पोटनिवडणूक होत असून प्रशासनाने त्यासाठीची तयारी पूर्ण केलीय, तर धुळे जिल्हा परिषदेच्या 14 गट आणि 28 जागांसाठी पोटनिवडणूक पार पडत असून मंगळवारी मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. दुसरीकडे पालघर जिल्हा परिषदेच्या 15 तर पंचायत समित्यांच्या 14 जागांसाठी मतदान होणार आहे. वाशिम जिल्हा परिषदेच्या 14 व पंचायत समितीच्या 27 गणांसाठी  पोट निवडणुकी साठी मतदान होत आहे. अकोला जिल्हा परिषदेच्या 14 आणि पंचायत समितीच्या 28 जागांसाठी ही पोटनिवडणूक होतेय