पहाटेच्या शपथविधीवरील दाव्यांमध्ये गोंधळ, एकाच आठवड्यात अजितदादांचे दोन वेगळे दावे
अजितदादांनी एकाच आठवड्यात दोन वेगवेगळे दावे केलेत. २० मार्च रोजी अजित पवार म्हणाले, ठरल्याप्रमाणे शब्द पाळा, असा अमित शाहांचा फोन आला होता आणि मी शब्द पाळायचं ठरवलं. तर नुकतेच २८ एप्रिल रोजी अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या संमतीवरूनच पहाटेचा शपथविधी झाला
पहाटेच्या शपथविधीवरून अजित पवारांनी नुकत्याच केलेल्या दाव्यावरून त्यांनी गेल्या काही दिवसांपूर्वी केलेल्या दाव्यावर प्रश्न चिन्ह उपस्थित होतंय. शिवाय सरकारबाबतची चर्चा शरद पवारांसोबत झाली होती पण शपथविधीच्या चार दिवस आधी शरद पवारांनी भूमिका बदलल्याचे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं. तर याविरूद्ध दावा अजित पवारांनी केलाय. यावरून असे लक्षात येतं की, अजितदादांनी एकाच आठवड्यात दोन वेगवेगळे दावे केलेत. २० मार्च रोजी अजित पवार म्हणाले, ठरल्याप्रमाणे शब्द पाळा, असा अमित शाहांचा फोन आला होता आणि मी शब्द पाळायचं ठरवलं. तर नुकतेच २८ एप्रिल रोजी अजित पवार म्हणाले, शरद पवार यांच्या संमतीवरूनच पहाटेचा शपथविधी झाला. २०२३ मध्ये फडणवीसांच्या दाव्यानुसार, सत्तास्थापनेच्या चर्चा शरद पवारांसोबत झाल्या, मात्र पहाटेच्या शपथविधीच्या ४ दिवसांपूर्वी शरद पवार दूर झाले. तर २०२४ ला अजित पवार म्हणताय, शरद पवार यांच्याच सांगण्यावरून आपण शपथविधी करून सत्तेत सामील झालो. बघा काय केले दोन वेग-वेगळे दावे?