Maharashtra एकाच दिवशी वेगवेगळ्या समाजांचे मोर्चे; मराठा, ओबीसी अन् धनगर समाजाची मागणी काय?
VIDEO | सांगलीत मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला. चंद्रपुरात ओबीसी महासंघानं मोर्चा काढला तर अहमदनगरच्या चौंडीत धनगर समाजानंही आरक्षणासाठी उपोषणचं हत्यार उपसलं
मुंबई, १८ सप्टेंबर २०२३ | सांगलीत मराठा समाजानं आरक्षणाच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढला. चंद्रपुरात ओबीसी महासंघानं मोर्चा काढला तर नगरच्या चौंडीत धनगर समाजानंही आरक्षणासाठी उपोषण सुरु केलंय. आरक्षणाच्या मागणीसाठी राज्यात एकाच दिवशी वेगवेगळ्या समाजांनी मोर्चे काढले गेले. आरक्षणाच्या मागणीसाठी सांगलीत मराठा समाजानं भव्य मोर्चा काढला. या मोर्चात मंत्री जयंत पाटीलही उपस्थित होते. विविध संघटनांचे नेते सहभागी झाले होते. शिवप्रतिष्ठानच्या संभाजी भिडेंनीही या मोर्चात उपस्थित लावत मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला. चंद्रपूरमध्ये ओबीसी महासंघानं भव्य मोर्चा काढला मराठा समाजाचा ओबीसीमध्ये समावेश करू नका अशी मागणी ओबीसी महासंघानं केली. विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्यासह राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे अध्यक्ष डॉ बबनराव तायवाडे देखील मोर्चात सहभागी होते.
तर अहमदनगरच्या चौंडीमध्ये धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी यशवंत सेनेचं 11 दिवसांपासून उपोषण सुरू आहे. ग्रामविकासमंत्री गिरीष महाजन यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन उपोषण मागे घेण्याची विनंती केली आहे. धनगर समाजाला एसटी प्रवर्गात समाविष्ट करावं या मागणीसाठी हे उपोषण सुरु आहे