गुन्ह्याच्या नंबरसह डिजिटल बारकोडिंग! धाराशिव पोलिसांचा अनोखा ई-मुद्देमाल उपक्रम
VIDEO | अवघ्या काही मिनिटात क्यूआर कोड स्कॅन केल्यावर मुद्देमाल सापडणार, बघा कसा आहे धाराशिव पोलिसांचा ई-मुद्देमाल अनोखा उपक्रम
धाराशिव : धाराशिव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या संकल्पनेतून ई मुद्देमाल हा उपक्रम राबविला जात असून ढोकी व आनंद नगर पोलीस ठाण्यात सुसज्ज यंत्रणा तयार केली आहे. या उपक्रमामुळे पोलिसांना तपासात मदत होत असून गुन्ह्यात शिक्षा होण्याचे प्रमाणही वाढत आहे. गुन्ह्यात जप्त केलेला मुद्देमाल एका बॉक्समध्ये ठेवण्यात आला असून त्याला गुन्ह्याच्या नंबरसह डिजिटल बारकोडींग केले आहे त्यामुळे , सापडतो. शिवाय तो सुरक्षित राहतो. तांत्रिक दृष्ट्या विश्लेषण करुन तपास केल्यानंतर हा महत्वाचा पुरावा कोर्टात सुनावणीवेळी सादर करता येतो.
Published on: Mar 16, 2023 07:09 PM
Latest Videos