दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत, उपचार सुरु, नेमकं काय घडलं? कशी आहे प्रकृती?
राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासंदर्भात एक बातमी समोर येत आहे. दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याची माहिती मिळतेय.
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासंदर्भात एक बातमी समोर येत आहे. दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर रूग्णालयात उपचार सुरू आहे. वळसे पाटील यांना हात, पाय आणि पाठीला दुखापत झाल्याचे कळतेय. वळसे पाटील रात्री अंधारात लाईट सुरु करायला जात असताना पाय घसरुन पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. दिलीप वळसे पाटील यांच्यावर पुण्यातील औध येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील, असा अंदाज वर्तविला जात आहे. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर दिलीप वळसे पाटील यांना दुखापत झाल्याने पक्षात चिंतेचं वातावरण आहे. त्यांच्या समर्थकांकडून वळसे पाटील लवकर बरे व्हावेत, अशी प्रार्थना केली जात आहे.