लवकरच बरा होऊन… दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा घरातच पाय घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाल्याची माहिती काही वेळापूर्वीच समोर आली होती. दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करून काय म्हटले.?
अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे बडे नेते आणि राज्याचे सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा घरातच पाय घसरून पडल्याने त्यांना दुखापत झाल्याची माहिती काही वेळापूर्वीच समोर आली होती. दिलीप वळसे पाटील रात्री आपल्या अंधारात घरातील लाईट सुरु करायला जात असताना पाय घसरुन पडल्याने त्यांना गंभीर दुखापत झाली. वळसे पाटील यांची सध्या प्रकृती स्थिर आहे. मात्र त्यांच्यावर 12 ते 15 दिवस रुग्णालयात उपचार सुरु रहातील, असा अंदाज वर्तविला जात असताना त्यांनी स्वतः ट्वीट करून आपल्या तब्येतीची माहिती दिली आहे. घरामध्ये पाय घसरून पडल्याने दिलीप वळसे पाटील यांना गंभीर दुखापत झाली आहे. त्याच्यावर सध्या पुण्यातील औध येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. दिलीप वळसे पाटील यांनी ट्वीट करून असे म्हटले की, काल रात्री राहत्या घरात पडल्यामुळे मला फ्रॅक्चर झाले असून डॉक्टरांच्या सल्ल्याने पुढील उपचार सुरू आहेत. काही काळ पूर्ण विश्रांती घेण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. लवकरच बरा होऊन आपल्या समवेत सामाजिक कामात सक्रिय होईल.