अमजद खान, निजामुद्दीन शेख, हिना साळुंखे नेमकं कोण? वळसे-पाटलांनी फोन टॅपिंग प्रकरणातील नेत्यांची टोपण नावं सांगितली
फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशी अहवालातून अहवालातून पुढे काय आलं तर 2017 ते 2018 या काळात पुणे शहरात आयुक्त असलेल्या रश्मी शुक्ला यांनी 4 लोकप्रतिनिधींचे 6 भ्रमणध्वनी टॅप केले होते. त्यात नाना पटोले यांचं नाव काय ठेवलं होतं तर अमजद खान. बच्चू कडू यांचं नाव ठेवलं होतं निजामुद्दीन बाबू शेख. संजय काकडे हे तर त्यावेळी भाजपचे खासदार होते. त्यांचं नाव ठेवलं होतं तरबेज सुतार. आशिष देशमुख त्यावेळी भाजपचेच आमदार होते, त्यांच नाव ठेवलं होतं रघू चोरगे.
गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी भाजपच्या काळात झालेल्या फोन टॅपिंग प्रकरणाचा उल्लेख केला आणि त्यात ज्या नेत्यांचे फोन टॅप करण्यात आले त्यांची नावं काय ठेवण्यात आली होती त्याची यादीच वाचून दाखवली. फोन टॅपिंग प्रकरणाच्या चौकशी अहवालातून अहवालातून पुढे काय आलं तर 2017 ते 2018 या काळात पुणे शहरात आयुक्त असलेल्या रश्मी शुक्ला यांनी 4 लोकप्रतिनिधींचे 6 भ्रमणध्वनी टॅप केले होते. त्यात नाना पटोले यांचं नाव काय ठेवलं होतं तर अमजद खान. बच्चू कडू यांचं नाव ठेवलं होतं निजामुद्दीन बाबू शेख. संजय काकडे हे तर त्यावेळी भाजपचे खासदार होते. त्यांचं नाव ठेवलं होतं तरबेज सुतार. आशिष देशमुख त्यावेळी भाजपचेच आमदार होते, त्यांच नाव ठेवलं होतं रघू चोरगे. आशिष देशमुखांचा दुसरा फोन, त्यांचं नाव ठेवलं हिना महेश साळुंके!… या अहवालात रश्मी शुक्ला यांच्याबद्दल गंभीर बाबी नमूद करण्यात आल्याचंही यावेळी वळसे-पाटील यांनी सांगितलं.