विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे षडयंत्र, विद्यार्थी स्वत: रस्त्यावर उतरतील असं वाटत नाही : गृहमंत्री

विद्यार्थ्यांच्या आंदोलनामागे षडयंत्र, विद्यार्थी स्वत: रस्त्यावर उतरतील असं वाटत नाही : गृहमंत्री

| Updated on: Jan 31, 2022 | 8:19 PM

काही तासांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरील आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी केला आहे. कारण पोलिसांच्या हाती आणखी एक महत्वपूर्ण व्हिडिओ लागला आहे. त्या व्हिडिओतील व्यक्तीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत, या प्रकरणात आणखी काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे.

मुंबई : काही तासांपूर्वी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या घराबाहेरील आंदोलनामागे षडयंत्र असल्याचा आरोप गृहमंत्री दिलीप वळसे-पाटलांनी केला आहे. कारण पोलिसांच्या हाती आणखी एक महत्वपूर्ण व्हिडिओ लागला आहे. त्या व्हिडिओतील व्यक्तीचा शोध सध्या पोलीस घेत आहेत, या प्रकरणात आणखी काही महत्वाचे धागेदोरे हाती लागण्याची शक्यता आहे. शालेय विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून केलेले आंदोलन हे योग्य नाही. महाराष्ट्रातील विद्यार्थी हुशार व अभ्यास करणारा आहे. विद्यार्थ्यांना त्यांच्या प्रश्नांसाठी काही भूमिका मांडायची होती तर त्यांनी राज्य सरकारकडे मांडायला हवी होती, असे मत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी मांडले. एवढ्या मोठ्या संख्येने विद्यार्थी रस्त्यावर येण्यामागे एखादी शक्ती असावी अशी शंका व्यक्त करत जाणीवपूर्वक असे घडवून आणण्याचा प्रयत्न होत असल्याचे प्रतिपादन गृहमंत्र्यांनी केले.