Maratha Reservation : ‘सगेसोयरे’ शब्दावरून जवळपास तोडगा निघाला? काय झाली शिष्टमंडळासोबत चर्चा?
सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनात मनोज जरांगे पाटील यांनी काही बदल सुचवलेत त्यावरून लवकरच जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहेत. सरकारच्या या शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांना लिखीत आश्वासन दिलंय
मुंबई, १७ जानेवारी २०२४ : सरकारच्या शिष्टमंडळाने मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यामध्ये सगेसोयरे या शब्दावरून जवळपास तोडगा निघाला आहे. सरकारने दिलेल्या लेखी आश्वासनात मनोज जरांगे पाटील यांनी काही बदल सुचवलेत त्यावरून लवकरच जरांगे पाटील आपली भूमिका मांडणार आहेत. सरकारच्या या शिष्टमंडळातील आमदार बच्चू कडू आणि मंगेश चिवटे यांनी जरांगेंची भेट घेऊन त्यांना लिखीत आश्वासन दिलंय. ज्यात जरांगेंनी बदल सुचवले असून पुढच्या काही तासात सरकार अद्यादेश काढू शकतं. जातीय विवाहातील मुला मुलींच्या नोंदींवरून कुणबी दाखले मिळणार असल्याचे बच्चू कडू म्हणाले. आंतरजातीय विवाहातील मुला-मुलींच्या नोंदींवरून कुणबींचं जातप्रमाणपत्र मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केलं. तर रक्ताच्या नातेवाईकांमधील काका, चुलते आणि आत्या यांचा समावेश झाल्याचे जरांगे म्हणालेत. यामध्ये सगेसोयरेवरून सर्व हा शब्द जोडण्यास जरांगेंनी सरकारला सांगितलंय. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट…