शिंदेंच्या शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् अजित दादांचं 15 दिवसांपूर्वीचं वक्तव्य चर्चेत

शिंदेंच्या शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् अजित दादांचं 15 दिवसांपूर्वीचं वक्तव्य चर्चेत

| Updated on: Mar 29, 2024 | 10:28 AM

गोविंदाच्या शिंदे गटाच्या प्रवेशामुळे १५ दिवसांपूर्वीच्या अजित पवार यांच्या वक्तव्याची चर्चा होतेय. तर यासोबत गोविंदा मुंबईत लढणार असल्याची चर्चाही सुरू झाली. गोविंदाच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर जयंत पाटील यांनी टोला लगावला. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय म्हणाले...?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री झाली आहे. गोविंदाने पक्षप्रवेशावेळी शिवसेनेचा भगवा हाती घेतला. गोविंदाने केलेल्या पक्षप्रवेशानंतर आता त्याला लोकसभेचं तिकीट मिळण्याची शक्यता आहे. गोविंदाच्या शिंदे गटाच्या प्रवेशामुळे १५ दिवसांपूर्वीच्या अजित पवार यांच्या वक्तव्याची चर्चा होतेय. तर यासोबत गोविंदा मुंबईत लढणार असल्याची चर्चाही सुरू झाली. गोविंदाच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर जयंत पाटील यांनी टोला लगावला. गोविंदाचे सिनेमे आता चालत नाही, त्यांचा शेवटचा सिनेमा फ्लॉप झाला… चालणारा तरी अभिनेता घ्या म्हणा… जयंत पाटलांनी कलाकारांचा अपमान करू नये असे मुख्यमंत्र्यांनी त्यांना सांगितलं. तर ज्यावेळी उमेदवार असतो तेव्हा राजकीय पक्ष अभिनेत्याला बाहेर काढतात, असं अजित पवार बोलले होते. यामध्ये शिंदे गटात प्रवेश केलेल्या गोविंदाचा उल्लेखही अजित पवार यांनी केला. बघा स्पेशल रिपोर्ट नेमकं काय म्हणाले…?

Published on: Mar 29, 2024 10:28 AM