भावी मुख्यमंत्रीपदाच्या स्पर्धेत राज ठाकरे? वाढदिवसानिमित्त मनसेकडून कुठं केली बॅनरबाजी?
VIDEO | 'राज ठाकरे हेच जनतेच्या मनातील मुख्यमंत्री', मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त मनसेच्या कार्यकर्त्यांनी नेमकी कुठं केली बॅनरबाजी? भावी मुख्यमंत्रीपदाच्या रेसमध्ये राज ठाकरेंची एन्ट्री!
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा आज ५५ वा वाढदिवस असून त्यानिमित्त उल्हासनगरमध्ये मनविसे जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी राज ठाकरे यांना शुभेच्छा देणारे बॅनर्स लावले आहेत. या बॅनर्सवर “जनतेच्या मनातील मुख्यमंत्री आदरणीय राज साहेब ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा!” असा मजकूर छापण्यात आला आहे. तसंच खुपते तिथे गुप्ते या कार्यक्रमातील काटेरी सिंहासनावर बसलेला राज ठाकरे यांचा फोटो या बॅनरवर छापण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेचे कोणतेही प्रश्न असतील तरी ते प्रश्न शिवतीर्थ इथे गेल्यावरच सुटतात आणि नागरिकांना न्याय मिळतो. त्यामुळेच जनतेच्या मनातील खरे मुख्यमंत्री हे राज ठाकरे हेच आहेत, अशा भावना यावेळी जिल्हा संघटक मनोज शेलार यांनी व्यक्त केल्या. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ५५ व्या वाढदिवसानिमित्त उल्हासनगरमध्ये लावण्यात आलेल्या या बॅनर्सची सध्या मोठी चर्चा आहे.