महायुती-मविआत जागा वाटपाची चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?

महायुती-मविआत जागा वाटपाची चर्चा सुरू, जागांवरून रस्सीखेच, कोण-कुठे मोठा भाऊ?

| Updated on: Sep 18, 2024 | 12:08 PM

गणेशोत्सव संपला आता महायुती आणि महाविकास आघाडीमध्ये जागा वाटपाची चर्चा सुरू होणार आहे. महायुतीत समन्वयाने जागा वाटप होईल आणि पुन्हा राज्यात महायुतीचे सरकार येईल असा विश्वासच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.

महाविकास आघाडीच्या जागावाटपाच्या बैठका सुरू होणार आहेत. ज्यामुळे महाविकास आघाडीमध्ये कोण किती जागांवर लढणार? यावर चर्चा होणार आहे. तर गेल्या काही दिवसांपूर्वी नितीन राऊत यांनी काँग्रेसच मोठा भाऊ असल्याचे म्हटले होते. त्यावर राऊतांनी महाराष्ट्रात उद्धव ठाकरे हेच हायकंमाड असल्याचे प्रत्युत्तर दिलं होतं. तर महायुतीमध्ये समन्वय असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. अशातच संजय राऊत यांनी ४० जागा भाजप देईल आणि पाच-दहा अधिक जागा शिंदेंच्या तोंडावर फेकतील अशी जवजळीत टीका केली आहे. पुढील तीन दिवस महाविकास आघाडीची जागा वाटपाची चर्चा सुरू असेल मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काँग्रसेने १२५ जागांची मागणी केल्याचे कळतेय. मात्र मविआमध्ये काँग्रेसला १०५ जागा, शिवसेनेला ९५ ते १०० जागा आणि राष्ट्रवादी ८५ ते ९० जागा लढू शकतात. बघा यासंदर्भातील स्पेशल रिपोर्ट

Published on: Sep 18, 2024 12:08 PM