BJP सोबत जाण्याबाबत चर्चा, मात्र स्वबळावर निवडणुका लढवाव्यात; पदाधिकाऱ्यांची भावना : Sandep Deshpande
आगामी निवडणुकांत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली, मात्र स्वबळावर निवडणूका लढवाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची भावना होती. सर्व ठिकाणी पक्षाची परिस्थिती चांगली आहे. अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे.
राज्यात सध्या महापालिका आणि नगरपरिषदांच्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत. त्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. मनसेनेही महापालिका निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. त्यासाठी राज ठाकरेंनी दौऱ्यांचा सपाटा लावला आहे. येत्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीतही मनसे तितक्याच जोमाने उतरणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मनसे भाजपच्या युतीच्या चर्चांनी जोर धरला होता. आगामी निवडणुकीत भाजप मनसे एकत्र लढणार असल्याचे संकेत अनेक राजकीय जाणकारांनी दिले आहेत. आगामी निवडणुकांत भाजपसोबत जाण्याबाबत चर्चा झाली, मात्र स्वबळावर निवडणूका लढवाव्यात अशी पदाधिकाऱ्यांची भावना होती. सर्व ठिकाणी पक्षाची परिस्थिती चांगली आहे. अशी माहिती मनसे नेते संदीप देशपांडे यांनी दिली आहे. मनसेचे महाराष्ट्रातील सर्व नेते आणि सरचिटणीस यांची 2 तास बैठक झाली. यात महापालिका निवडणुकीबाबत राणनितीवर चर्चा झाली. आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर विभागवार मेळावे, बैठका राज ठाकरे घेणार आहेत. त्याला 14 तारखेपासून सुरूवात होणार आहे.